मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून योग्य वेळ आल्यावर भूमिका मांडेन असे सूचक विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशाराही दिला होता.
‘योग्य वेळ आल्यानंतर सरकारच्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सपाटून बोलणार आहे,’ असंही उदयनराजे भोसले म्हणाले. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असेही वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केले होते.
गुणवत्तेनुसार आरक्षण मिळाले पाहिजे या आपल्या भूमिकेचा उदयनराजे यांनी पुनरुच्चार केला आहे. बांदा येथे त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही अनौपचारिक गप्पा मारताना आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवकांना आर्थिक मागास प्रवर्गातील EWS आरक्षण स्वीकारु नये, असं आवाहन केलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी यापूर्वी देखील राज्य सरकारकडे मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका मांडली होती. EWS आरक्षण स्वीकारल्यास SEBC च्या आरक्षणाला अडचण निर्माण होईल, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका


