Share

Maharashtra Rain Update | यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, हवामान खात्याचा अंदाज

Published On: 

Mumbai : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने परतीच्या पावसाची चाहूल राज्यातील काही भागात दिली आहे. राज्याच्या काही भागांत 30 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागच्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरूवात केली आहे. काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई शहरासह दादर, रावळी कँप यासह अन्य भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (दि.24) आणि उद्या (दि.25) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

विदर्भ आणि कोकण-गोवा सोडून महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी होईल. उत्तर-मध्य कोकणात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ आणि दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तर पुण्यासह राज्यात त्या कालावधीत साधारण पाऊसच्या सरी पडू शकतात.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.

26 सप्टेंबरला लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. 27 सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 28 सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांना, मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, नांदेड जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!