🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रसिद्ध यूट्यूबर बिनधास काव्या बेपत्ता झाली असल्याची माहिती समोर आली होती. तिला शोधण्यासाठी तिच्या पालकांनी तिच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करत सगळ्यांची मदत मागितली होती. मात्र हे सर्व काही फाॅलवर्स वाढवण्यासाठी रचलेला कट असल्याचं समोर आलं आहे.
बिनधास काव्या झाली होती बेपत्ता :
काव्या च्या यूट्यूब चॅनेलला 4 मिलीयन पेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत. तिच्या चॅनेलचं नाव ‘बिनधास काव्या’ असं आहे. या तरुणीने अगदी कमी वयात यशाची उंच भरारी घेतली आहे. मात्र, तिच्या अचानक बेपत्ता झाल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, हे सगळं काही काव्या आणि तिच्या पालकांनी फाॅलोअर्स वाढवण्यासाठी केलं असल्याचं समोर आलं आहे.
अभ्यासाच्या कारणावरून तिचे वडील तिच्यावर रागावले होते:
अभ्यासाच्या कारणावरून तिचे वडील तिच्यावर रागावले होते. त्यानंतर ती रागाच्या भरात निघून गेली असावी, असे तिच्या वडिलांनी तक्रार अर्जात म्हटलं होतं. एवढंच नाही तर पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप देखील काव्याच्या पालकांनी केला होता. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी अनेक प्रयत्न करुन काव्याला शोधलं होतं.
दरम्यान, काव्या इटारसी (मध्य प्रदेश) रेल्वे स्टेशनवर सापडली होती. तसेच ती तिच्या घरी अर्थात लखनऊला चालली असल्याची माहिती समोर आली होती. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती तिच्या एका मित्राच्या घरी चालली होती. संबंधित मित्र लखनऊचा रहिवासी आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- Devendra Fadnavis | “सत्तेवर असताना यांनी केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायचं काम केलं आणि आता…”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
- Santosh Bangar । “…तर त्यांना दाखवलं असतं”; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया
- Santosh Bangar । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
- Devendra Fadnavis | “मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
