मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर या कार्यक्रमात त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलं आहेत. ज्यावरुन शरद कोळी देखील आक्रमक झाले होते. अशातच मराठा आरक्षण बाबत देखील त्यांची जीभ घसरली आहे.
तानाजी सावंत यांची मराठा आरक्षण बाबत जीभ घसरलीः
सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आदीच तानाजी सावंतांच्या वादग्रस्त टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.
काय म्हणाले सावंत?:
यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.
दरम्यान, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका, मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही”
- Bindass Kavya | फॉलोअर्स वाढवण्यासाठी बिंदास काव्या झाली होती गायब ; पालकांनी मिळून केला चित्रपटाला लाजवेल असा ड्रामा
- Uday Samant | संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- Devendra Fadnavis | “सत्तेवर असताना यांनी केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायचं काम केलं आणि आता…”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
- Santosh Bangar । “…तर त्यांना दाखवलं असतं”; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया


