Share

Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही”

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिंदे गट आणि भाजप पक्षाच्या नेत्यांना समान वाटप करण्यात आले. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालक मंत्री केले आहे. त्यामुळे यामुद्यावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा जिल्हे कसे सांभाळणार असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधाला होतो. नाना पटोलेंच्या याच वक्तव्यावरून भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

नाना पटोले हे देवेंद्र फडणवीस यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. त्यांनी आधी स्वत:च्या मतदारसंघात बघावं. मग इतरांवर टीका करावी, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे. बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात आणि मुख्यमंत्री असताना, जी विकासकामे केली. त्याची एक टक्का बरोबरीसुद्धा नाना पटोले करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्याची तसेच महाराष्ट्राची सखोल माहिती आहे. देवेंद्र फडणवीस संपूर्ण अभ्यास केलेले नेते असल्यासंही बावनकुळे यांनी म्हटलं.

तसेच नाना पटोले यांनी स्वत:च्या जिल्ह्यात जाऊन आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, हे बघितले पाहिजे. शेतकऱ्यांचे बोनस महाविकास आघाडी सरकारने देऊ केले होते. ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यांच्या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्याकडे नाना पटोलेंनी लक्ष द्यावं, असं बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!