पुणे : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर महाराष्ट्रात येणारा मेडिसीन डिव्हाइस पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे,असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता. एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकता का?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
अडीच वर्षे सत्तेवर होतात. त्या काळात त्यांनी काहीच केलं नाही, केवळ केंद्र सरकारवर टीका करायचं काम केलं. आता काहीतरी मनात येईल ते बोलता.मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात मंजूर झाला होता नि मग तो दुसरीकडं गेला. रोज खोटं बोलायचं आणि तेही रेटून बोलायचं. अशा खोटं बोलण्यानं महाराष्ट्र कधीचं पुढं जाणार नसून, आम्ही हिमतीनं महाराष्ट्रात गुंववणूक आणली आणि यापुढंही आणून दाखवू.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
दरम्यान,वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे.उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे.याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?, ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Bangar । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
- Devendra Fadnavis | “मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात”
- राजस्थानचे राजकारण तापले, सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर 92 आमदार राजीनामा देणार ?
- Aditya Thackeray | वेदांता-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकरावर हल्ला
- Chandrashekhar Bawankule | “एक दिवस त्यांच्या व्यासपीठावर केवळ चारच लोकं तुम्हाला दिसतील, पाचवी व्यक्ती दिसणार नाही”


