🕒 1 min read
पुणे : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच यावरून शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले उदय सामंत ?
राज्यात घाणरडे राजकारण सुरु झाले असून हे वेळीच बंद होणे गरजेचे आहे. हा प्रकार घडला असेल तर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिला आहे. उदय सामंत यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास टक्के एकदम ओके नारे देखील दिले. बांगर यांच्या गाड्या आडवत ते ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.
संतोष बांगर यांची प्रतिक्रिया –
दरम्यान, या प्रकरणी स्वत: संताष बांगर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवलं असतं की संतोष बांगर काय आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Bangar । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
- Devendra Fadnavis | “मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात”
- राजस्थानचे राजकारण तापले, सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील तर 92 आमदार राजीनामा देणार ?
- Aditya Thackeray | वेदांता-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकरावर हल्ला
- Chandrashekhar Bawankule | “एक दिवस त्यांच्या व्यासपीठावर केवळ चारच लोकं तुम्हाला दिसतील, पाचवी व्यक्ती दिसणार नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
