मुंबई : राज्यातील मोठ्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. यानंतर हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. दोन्ही बाजूंकडून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. शिवसेनेने केलेल्या याचिकेवर दोन दिवसात सुनावणी होणार आहे. असे असतानाच विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावल्या आहेत.
याआधी विधान सभेत बहुमत चाचणीच्या दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटाकडूनही व्हीप जारी करण्यात आला होता. या माध्यमातून आपलाच पक्ष खरा असे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पक्षावर दावा करण्याच्या हेतून शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांना आणि शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
यानंतर विधीमंडळ सचिवांनी शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे या आमदारांना 7 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. यावेळी शिवसेना कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा सवाल उपस्थित झाल्याने नोटीस बजावलेल्या आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

