🕒 1 min read
श्रीलंका : आर्थिक संकटात असणाऱ्या श्रीलंकेत हजारो संतप्त नागरिक अध्यक्ष गोताबया राजपक्षे (President Gotabhaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्यांची मागणी करीत त्यांच्या निवासस्थानी घुसले. तर आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे (Prime Minister Ranil Wickremesinghe) यांच्या खासगी मालकीच्या घराला आगही लावली आहे. श्रीलंकेतील सरकारविरोधातील हे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे.
दरम्यान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली. तर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आंदोलकांच्या भीतीने घरातून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंका सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे. परकीय चलन टंचाई , इंधन, अन्नधान्य आणि औषधांच्या आयातीवर मर्यादा आली असून सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे.
‘व्होल कंट्री टू कोलंबो’ अशी घोषणा देत आंदोलक कोलंबोच्या फोर्ट भागात जमा झाले आहेत. अध्यक्ष राजपक्षे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निदर्शकांनी इशारा दिला आहे. या आंदोलनाला सनथ जयसूर्या, कुमार संघकारा यांसह श्रीलंकेच्या काही माजी क्रिकेटपटूंनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी शनिवारी सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी राजीनाम्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या:
- Shivsena : शिवसेना आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या; विधीमंडळ सचिवांनी दोन्ही बाजूंकडील आमदारांना बजावल्या नोटीसा
- Sanjay Raut : बाळासाहेबांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांनी म्हटले, “विठ्ठल…विठ्ठल”
- Ekadashi 2022 : “शिंदे-फडणवीस सरकार हे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल”; रावसाहेब दानवेंचा विश्वास
- The Ghost : नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित : पाहा TEASER
- Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात महापूजा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
