🕒 1 min read
मुंबई: आज (१० जुलै) आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून राजकीय मंडळीकडून नागरिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्वीटर पोस्ट सध्या चर्चेत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विठ्ठलासोबत फोटो पोस्ट करत “विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल..” असे कॅप्शन असणारे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाणारी खरी शिवसेना असल्याचे म्हटले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सतत संघर्ष सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज आषाढी एकादशीच्या पर्वाला केलेली संजय राऊत यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…
विठ्ठल…विठ्ठल… विठ्ठल.. pic.twitter.com/q2jdxdv3oA— Sanjay Raut (@rautsanjay61) July 10, 2022
दरम्यान शिवसेनेशी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे सपत्नीक शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत यंदा शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (Nawale farmer couple) यांना महापुजेचा मान मिळाला.
महत्वाच्या बातम्या:
- Sameer Paranjape : “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आहे तर…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्याची ‘ती’ इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
- Sanjay Raut : “नागरिकांच्या खात्यात 40 ते 45 लाख रुपये मोदी सरकार…”, संजय राऊतांचा टोला
- Ajit Pawar : “पत्नी म्हणते नवरा वेश बदलून जायचा, नेते म्हणतात आमचा संबंध नाही”; अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
- Sanjay Raut : “नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
- Malaika Arora : मलायकाचा साडीमधील हटके लूक पाहून चाहते घायाळ! पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
