🕒 1 min read
मुंबई : आदित्य ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर शिवसेना पक्ष रामदास कदम यांच्यावर जोरदार भडकला आहे. अनेक नेत्यांनी रामदास कदम यांना धारेवर धरलं असून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
सुषमा अंधारे यांचं ओपन चॅलेंजः
रामदास कदम यांच्या विरोधात सुषमा अंधारे उद्यापासून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर सरड्यापेक्षाही जास्त रामदास कदम आपले रंग बदलत असून त्यांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम हा चिल्लर माणूस आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना पुन्हा डिवचण्याचं काम केलं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता रामदास कदम यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ, मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल, नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते, म्हणजे खोके काय असतील ते कळेल, असं रामदास कदम म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- महागाईचा तडाखा, दिवाळीपूर्वी महागणार महिंद्रा थार
- Ajit Pawar | “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा, पण…”, रामदास कदमांवर अजित पवार संतापले
- Viral Monkey Video | माणसाची बॅग उघडून माकड चोरी करताना दिसले, व्हिडिओ पाहून हसू आवरेना
- Ayurvedic Treatment For PCOD | PCODची समस्या दूर करण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय वापरा
- Hero Electric Scooters Price | हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती सोबतच जाणून घ्या ‘या’ गोष्टी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
