Share

महागाईचा तडाखा, दिवाळीपूर्वी महागणार महिंद्रा थार

Published On: 

दिवाळीपूर्वी कार कंपन्या आपापल्या कारवर ऑफर देऊन कार खरेदीदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्राने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे, महिंद्राने आपल्या स्पोर्टी कार महिंद्रा थार च्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे थारच्या खरेदीदारांमध्ये काहीशी निराशा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही वाढ सर्व मॉडेल्समध्ये एकसारखी नाही. किमतीत वाढ झाल्यानंतर, महिंद्रा थारची किंमत 13.59 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) वरून 16.29 लाख रुपये (टॉप एंड वैरिएंटवर) झाली आहे.

पेट्रोल मॉडेल्सच्या किंमती वाढल्या:

महिंद्र थार चार पेट्रोल प्रकारांमध्ये येते आणि कंपनीने तिच्या सर्व प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने तिच्या AX (O) CT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX HT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX CT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 6000 रुपयांनी आणि LX HT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या किमती 7000 रुपयांनी वाढवल्या आहेत.

डिझेल मॉडेल्सच्या किंमती वाढल्या:

महिंद्रा थार सहा वेगवेगळ्या डिझेल मॉडेल्समध्ये येते. कंपनीने तिच्या सर्व प्रकारांच्या किमतींमध्येही वाढ केली आहे, तिच्या AX (O) CT मॅन्युअल ट्रान्समिशन, AX (O) HT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX CT मॅन्युअल ट्रान्समिशन, LX HT मॅन्युअल ट्रान्समिशन या मॉडेल्सच्या किमती कंपनीने 28,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. दुसरीकडे, LX CT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, LX HT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या किमतीत 26,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

महिंद्रा थार इंजिन:

त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा थार देशांतर्गत बाजारात दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. त्याचे 2.2-लिटर mHawk डिझेल-इंजिन 130 bhp ची कमाल पॉवर आणि 300 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. आणि त्याचे 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड mStallion पेट्रोल-इंजिन 150 bhp कमाल पॉवर आणि 320 Nm मैक्सिमम टॉर्क जेनरेट करते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!