🕒 1 min read
पुणे : सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांवर टीका करत आहेत. या सगळ्या प्रकारावर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेवर अजित पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं आहे.
तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा, पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राची परंपरा नाही.महाराष्ट्राला तशी शिकवण नाही. ज्यात राज्याचं नुकसान होतंय, बेरोजगारांच्या नोकऱ्या जातायत, अशा विषयांवर बोला. वैयक्तिक टीका-टिप्पणी कशाला करता? कुणी दाढी वाढवावी, कुणी दाढी काढावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यावर बोलण्याचं काय कारण आहे?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
मागच्या काळात काही लोकांनी मोठ्या नेत्यांची चेष्टा केली होती. सोनिया गांधींचीही काहींनी चेष्टा केली होती. ते लोकांना आवडलं नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकारचं काही चुकत असेल तर विरोधकांनी ते दाखवावं. विरोधकांचं काही चुकत असेल, तर ते सरकारनं दाखवावं. पण कुणाच्या लग्नाचं काय झालं, कुणाच्या दाढीचं काय झालं हे कशाला?” अशा शब्दांत अजित पवारांनी रामदार कदम यांना सुनावालं आहे.
दरम्यान, आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ, मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल, नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते, म्हणजे खोके काय असतील ते कळेल, असं रामदास कदम म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Monkey Video | माणसाची बॅग उघडून माकड चोरी करताना दिसले, व्हिडिओ पाहून हसू आवरेना
- Ayurvedic Treatment For PCOD | PCODची समस्या दूर करण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय वापरा
- Hero Electric Scooters Price | हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती सोबतच जाणून घ्या ‘या’ गोष्टी!
- Water In Ear | कानात पाणी गेल्यावर काय केले पाहिजे,जाणून घ्या!
- Ramdas Kadam | … अन् रामदास कदम यांनी भास्कर जाधवांची तुलना थेट कुत्र्याशी केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
