🕒 1 min read
मुंबई : PCOD ची समस्या 12-45 वर्षे वयोगटातील सुमारे 27% महिलांना होते. ही एक अतिशय सामान्य स्थिती आहे. स्त्रियांना दोन अंडाशय असतात. यामध्ये दर महिन्याला एक अंडं बाहेर पडतं. हे अंडं गर्भाशयात जातं.हे अंडं दर महिन्याला बाहेर आलं तर ठीक अन्यथा त्याच्या जागी लहान ढेकूळ तयार होऊ लागतात. पीसीओडीचे हे एकमेव कारण नाही, जेव्हा महिलांच्या शरीरात पुरुषांचा ‘टेस्टोस्टेरॉन’ हार्मोन वाढतो, तेव्हाही ही समस्या उद्भवते. यामुळे अंडाशयातून अंडी बाहेर येणं बंद होतं. या स्थितीला ‘अनोव्ह्युलेशन’ म्हणतात, म्हणजेच स्त्रीबिजांचा अभाव. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला च्या समस्येवर काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.
ल्युकम कॅप्सूलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. ल्युकम पीसीओडीने ग्रस्त असलेल्या 90% महिलांमध्ये सकारात्मक परिणाम देण्यास सक्षम आहे. हे हार्मोन्स संतुलित करते. मासिक पाळी नियमित करते.
चांदीचा वापर करा
PCOD टाळण्यासाठी किंवा त्यातून सुटका करण्यासाठी, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्या आणि कोणतेही चांदीचे दागिने घाला. कारण चांदी एक शीत धातू आहे ज्यामुळे स्त्रियांना शांत राहण्यास आणि रोग बरे करण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही चांदीचे पयंजण देखील वापरु शकता.
ज्या महिलांना वारंवार मासिक पाळी येते त्यांच्यासाठी
100 ग्रॅम धणे आणि 100 ग्रॅम आवळा घ्या आणि दोघांचं मिश्रण करा. यानंतर दीड ग्लास पाण्यात या मिश्रणाचा एक छोटा चमच टाकून मंद आचेवर उकळा. पाणी एक कप राहिलं की ते गाळून प्या. हा उपाय दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या एक तास आधी घ्या.
मासिक पाळी उशिरा येणाऱ्या महिलांसाठी उपाय
100 ग्रॅम ओवा आणि 100 ग्रॅम गाजरच्या बिया बारीक करून मिश्रण तयार करा. एक छोटा चमचा आणि अर्धा ग्लास पाणी एकत्र करून मंद आचेवर उकळा, एक कप पाणी कमी झाले की गाळून घ्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या एक तास आधी फिल्टर केलेले पाणी प्या.
जर तुम्हाला PCOD चा त्रास होत असेल आणि तुम्ही या आयुर्वेदिक उपायांचे पालन करत असाल, तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या आहारातून समुद्री मीठ आणि आंबट पदार्थ काढून टाका आणि मिठाई टाळा.
महत्वाच्या बातम्या :
- Hero Electric Scooters Price | हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती सोबतच जाणून घ्या ‘या’ गोष्टी!
- Water In Ear | कानात पाणी गेल्यावर काय केले पाहिजे,जाणून घ्या!
- Ramdas Kadam | … अन् रामदास कदम यांनी भास्कर जाधवांची तुलना थेट कुत्र्याशी केली
- Government Exam Update | केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, SSC मध्ये अनेक रिक्त पदांसाठी भरती
- Sharad Pawar | शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर ; अतुल भातखळकरांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
