🕒 1 min read
मुंबई : प्रभासचा ‘राधेश्याम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि त्याच्याशी निगडीत प्रमोशनचं काम झाल्यानंतर प्रभासने ब्रेक घेतला आहे. तो सध्या स्पेनमध्ये असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्पेनमधील बार्सीलोना याठिकाणी प्रभासवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. सालार या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात झाला होता. यावेळी प्रभासला दुखापत झाली होती. आता त्याच दुखापतीचा त्रास वाढल्याने प्रभासला सर्जरीसाठी स्पेनला जावं लागलं आहे
‘राधेश्याम’ हा चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने माध्यमांपासून दूर जाण्यासाठी प्रभास स्पेनला गेला, असं काहींचं म्हणणं होतं. मात्र चित्रपटाच्या अपयशामुळे नाही तर सर्जरीसाठी तो तिथं गेल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी ‘राधेश्याम’ने आतापर्यंत 185 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
