Share

इम्तियाज जलील यांच्या विधानाने राजकारणात भूकंप; उमटल्या अनेक खळबळ जनक प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी तयार आहोत. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले दिसत आहे. या विधानामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे की, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचाच हा डाव आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले की, एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी देखील यावर वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय क्षेत्रात कोणाला एकत्र काम करायचे असेल तर त्यांनी एकत्र आले पहिजे. समविचारी पक्ष सगळ्यांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे.

दरम्यान त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असेल तर हे सर्व नागरिकांसाठी आणि राज्यासाठी उत्तम आहे. मात्र शिवसेना या विषयावर चांगलीच आक्रमक झाली आहे. काही नेत्यांनी या विषयावरून भाजपला वेठीस धरले आहे. शिवसेनेबाबत बोलताना मात्र सुप्रिया सुळेंनी मला विषय माहिती नाही म्हणत सावधपणा घेतला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!