नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिला असून यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. यासोबतच तस्लिमा यांनी बांगलादेशी हिंदूंबाबतही काही प्रश्न उपस्थित केलेत. तस्लिमा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये राहण्याचा हक्क परत मिळायला हवा, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
Watched The Kashmiri Files today. If the story was 100% true, no exaggeration, no half truth— then it is really a sad story & Kashmiri Pandit must get back their right to live in Kashmir. I don’t understand why no film was made on the exodus of Bengali Hindus from Bangladesh.
— taslima nasreen (@taslimanasreen) March 18, 2022
“तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमध्ये म्हंटलंय, मी नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिलाय. ही कथा शंभर टक्के सत्य असेल आणि यात कोणतीही अतिशयोक्ती नसेल, तसेच अर्धसत्यही दाखवलं गेलं नसेल, तर ही खरोखरच दुःखद कथा आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये राहण्याचा अधिकार परत मिळायला हवा. बांगलादेशी हिंदूंना बांगलादेशातून हाकलून लावण्यावर कोणी चित्रपट का बनवला नाही, हे मला समजत नाहीय, असंही त्या म्हणाल्या”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

