Share

“काँग्रेस मगरीचे अश्रू ढाळत नाही प्रत्यक्ष काम करते”, भाजपला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. भाजप विरुद्ध कोंग्रेस असा संघर्ष रंगताना दिसून येत आहे. यावर अनेक राजकीय प्र्तिक्रिया देखील उमटत आहेत. आता यावरूनच महाराष्ट्र कोंग्रेसच्या अधिकृत ट्वीटर वरुन भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असताना केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावरील सरकार असूनही भाजपने मौन साधलं. मात्र स्व. राजीव गांधींनी याविरुद्ध आवाज उठवत संसदेला घेराव घातला. पंडितांच्या पुनर्वसनासाठी हजारो घरे बांधली, नोकऱ्या दिल्या. काँग्रेस मगरीचे अश्रू ढाळत नाही प्रत्यक्ष काम करते.”, असा टोला कोंग्रेसने भाजपला लगावला आहे.

देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचीच चर्चा रंगली आहे. हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!