मुंबई : विनोदाचा बादशाह अशी कुशल बद्रिकेची ओळख आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून कुशल बद्रिके हे नाव घराघरांत लोकप्रिय झाले. नुकतंच कुशल बद्रिकेने होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कुशल बद्रिकेने त्याने काल कशाप्रकारे धुळवड साजरी केली याबाबत एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो, त्याची पत्नी आणि इतर सर्वजण छान धुळवड खेळताना दिसत आहेत. यात ते फार उत्साहात होळी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी ते विविध गाण्यांवर डान्स करतानाही दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने त्याला फार अनोखे कॅप्शन दिले आहे. “मला चित्र काढायला कधीच आली नाहीत, पण नात्यांमध्ये रंग भरता आले , त्यामुळे आयुष्याचं चित्र मात्र छान जमलं. “आयुष्य सुंदर आहे, ते ह्याच रंगांमुळे.” रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा”, असे कुशलने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
कुशल बद्रिकेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकजण लाईक्स आणि कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्याची ही पोस्ट आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

