Share

महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे टिकणारच; सुप्रिया सुळेंचा विश्वास

Published On: 

नवी दिल्ली : महराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्षे उलटली. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या एकाही नेत्याने महाविकास आघाडीचे ((Mahavikas Aghadi) सरकार पडणार असल्याचे वक्तव्य केले नाही असे नाही. महाविकास आघाडी सरकार पडण्याचा सातत्याने दावा करणाऱ्या सर्व विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत चांगलेच खडसावले आहे.

सरकार पडण्याची काळजी करुच नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उत्तम प्रकारे चालत आहे. महाविकास आघाडी सरकार आणखी पंचवीस वर्षे टिकणारच, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करू पाहणाऱ्या भाजपला खडसावून सांगितले आहे.

एका केंद्रीय मंत्र्याने तर आमच्याकडे दोषमुक्त करण्याची जादूची पावडर आहे, असे म्हटले होते. याचाच अर्थ सत्तेच्या जोरावर तुमच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न करा. महाविकास आघाडी सरकारवर तुमच्या या प्रयत्नांचा कोणताही परिणाम होणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ठरवून गोष्टी केल्या जात आहेत. अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर एका वर्षात सात वेळा ईडीने धाडी टाकल्या. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह राज्यातील अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावत त्यांना त्रास दिला जात आहे. केवळ नेतेच नाहीत तर त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले जात आहे. मात्र तरीही या चौकशांमधून काहीच निष्पन्न होत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!