मुंबई: जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी ट्वीट करत जात-पात भाषा भेद न करता मूलभूत हक्कांचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
आजच्या जागतिक मानवी हक्क दिवस निमित्त कोणतीही जात-पात भाषा भेद न करता प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर मानवी हक्क दिनानिमित्त, आपण एकमेकांच्या हक्कांचा आदर करण्याची आणि चांगल्या आणि अधिक शांततेच्या जगाकडे वाटचाल करण्याची शपथ घेऊ या. असे ट्वीट करत सर्वांनी मानवी हक्कांचा आदर करावे असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.
आजच्या जागतिक मानवी हक्क दिवस निमित्त कोणतीही जात-पात भाषा भेद न करता प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.
Human Rights Day.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 10, 2021
दरम्यान या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आजच्या दिनी मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा. मानवाधिकार हे वंश,लिंग,राष्ट्रीयत्व,भाषा, धर्म या कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी अंतर्भूत आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिप्राय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर हक्क समाविष्ट आहेत. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. असे ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा
- ‘अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, केंद्राच्या नावाने हात पाय…’


