🕒 1 min read
मुंबई: भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक व्यक्त करत आहे. सर्वसामान्य माणसापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापर्यंत सर्वांनाच त्यांच्या अशा निधनाने दुःख झाले आहे. तमिळनाडूतील कुन्नूरनजीक भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. देशभरातून बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला ८ डिसेंबर रोजी भीषण दुर्घटना घडली. यात एकूण १४ लोक होते, ज्यांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टर वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं. मात्र त्या आधीच ही दुर्दैवी दुर्घटना घडली. जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले सीडीएस (CDS) होते. आज देसभारतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर देखील श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) उपस्थित होते. मात्र त्यांना कोणाचं निधन झालं त्यांचं पूर्ण नाव देखील माहीत नव्हते.
https://www.facebook.com/watch/?v=239675994800998
गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याआधी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला त्यांचं पूर्ण नाव काय होतं? अशी विचारणा करतात. यावर त्यांनी बिपिन रावत सांगितलं असता ते कोण होते? अशी विचारणाही ते करतात. यानंतर तिथे उपस्थित त्यांनी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख होते आणि त्यांच्या पत्नीही सोबत होत्या अशी माहिती देतात. यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा बिपिन रावत हे नाव बरोबर आहे ना, अशी खातरजमा देखील करतात. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत
- ‘युपीत रामराज्य प्रस्थपित झाले, अभिनंदन योगीजी!’
- जात-पात भाषा भेद न करता मूलभूत हक्कांचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी-निलेश राणे
- ‘मनसे म्हणजे गळकं घर’
- नाशिकमधील पहिली ते सातवीच्या शाळा उघडणार ‘या’ तारखेपासून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
