🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमधील (UP) कानपूर देहात येथे पोलीस एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीच्या कडेवर एक चिमुकली असताना पोलीस त्याला काठ्यांनी मारहाण करत आहेत. ही घटना अकबरपूर येथील जिल्हा रुग्णलयासमोरील आहे. यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी ट्विट करत केंद्र सरकार व उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यावर निशाना साधला आहे.
ये यूपी है। यहां न्याय मांगने वालों को पहले पुलिस की लाठियां खानी पड़ती है, भले ही पीड़ित व्यक्ति की गोद में नन्हीं बेटी चीखती हो।
बधाई हो आदित्यनाथ जी, रामराज्य स्थापित कर दिया। pic.twitter.com/SYGFHzjcKy
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) December 10, 2021
याबाबत नितीन राऊत तो व्हिडीओ ट्विट करत म्हणाले, ‘हे उत्तर प्रदेश आहे. इथे न्याय मागणाऱ्याला पोलिसांच्या काठ्या खाव्या लागतात. भलेही पीडित व्यक्तीच्या कडेवर चिमुकली मुलगी रडत असेल. शुभेच्छा योगी आदित्यनाथजी, रामराज्य स्थापन झालं आहे. अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे.
दरम्यान मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक वीके मिश्रा याला निलंबित करण्यात आले आहे. सदरील पोलीस निरीक्षकाने मारहाण करताना त्या चिमुकल्या मुलीलाही हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. सदरील व्हिडीओमध्ये पीडित व्यक्ती मुलीला लागेल मारु नका, अशी विनंती त्या पोलीस निरक्षकास करताना दिसत आहे. सदरील आंदोलनकर्ते रुग्णालयातील ओपीडीला बंद करण्याचा प्रयत्न करत होते. असा दावा आता पोलिसांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा
- ‘अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, केंद्राच्या नावाने हात पाय…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
