Share

भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : गुरुवारी(९ डिसें.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लोकशाही शिखर परिषदेचे उद्घाटन केले. तसेच यावेळी जागतिक स्तरावर लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी भारत भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे. लोकशाहीच्या तत्त्वांनी जागतिक प्रशासनाला मार्गदर्शन केले पाहिजे आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी मुक्त आणि लोकशाही समाज जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,’जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बहुपक्षीय मंचांसह जागतिक स्तरावर लोकशाही मूल्यांना बळकट करण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांसोबत काम करण्यास तयार आहे.’ तसेच लोकशाही देशांनी त्यांच्या संविधानात अंतर्भूत मूल्ये पूर्ण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही शासनाचे ४ स्तंभ म्हणून संवेदनशीलता, जबाबदारी, सहभाग आणि सुधारणा यावर भर दिला.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’७५ वर्षांपूर्वी याच तारखेला भारताच्या संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले होते.’ तसेच कायद्याच्या राज्याचा आणि बहुसंख्यक आचारसंहितेचा आदर यासह लोकशाही भावना भारतीय लोकांमध्ये अंतर्भूत आहे,असेही मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!