Share

कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपुर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा लग्न सोहळा पार पडला. सोशल मीडियावर कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले. या फोटोला अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी कमेंट्स करून विकी आणि कतरिनाला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले. या फोटोला अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी कमेंट्स करून विकी आणि कतरिनाला शुभेच्छा दिल्या.

कतरिना आणि विकी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये विवाह बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी पाच मजल्यांचा केक एका इटालियन शेफकडून बनवून घेण्यात आला असून भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींचे स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. तसेच त्यांच्या लग्नातील फोटो देखील मोठया प्रमाणात व्हायरल झाले आहे.

https://www.instagram.com/p/CXRDUNSvWlZ/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर कतरिना आणि विकीच्या फोटोवर प्रियंका चोप्रा ने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रियंकाने कमेंटसमध्ये म्हणाली, ‘मेरे यार की शादी…., परफेक्ट टुगेदर…’ तुम्हा दोघांचे ही अभिनंदन.’ तसेच आलिया भटने कमेंट केली, ‘तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसत आहात.’ तसेच दीपिका, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीति चोप्रा या सेलिब्रिटींनी देखील विकी आणि कतरिनाला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. तसेच करिनाने विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, ‘प्रेमाची ताकद, तुम्हा दोघांना शुभेच्छा’. तर कतरिनाच्या फोटोला करिनाने कमेंट केली, ‘You did it’.त्याचप्रमाणे चाहत्यांनी त्या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून लाईक, कमेंट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!