Share

जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवरला अटक

Published On: 

नाशिक – जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर याला अटक करण्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळालं. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नाशिक येथून सुनील झंवरला अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेल्या टिप्सनुसार त्यांनी कालच नाशिक शहरात त्याचा शोध सुरु केला होता. झंवर एका परिचीताच्या घरी आला असल्याचे समजल्यावर त्यांनी सकाळी ही कारवाई केली. त्यानंतर त्याला नजीकच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर सध्या त्याला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले आहे.

बीएचआर म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेत सुनिल झंवर याने पत संस्थेच्या मालमत्ता कमी किंमतीत आपल्या जवळच्या नातलग आणि मित्र मंडळींच्या नावे खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या घोटाळ्यात यापूर्वीच पाच जणांना अटक झालेली आहे. मुख्य संशयीत सुनील झंवर यांने अटक टाळण्यासाठी गेले आठ महिने विविध प्रयत्न केले. त्याने मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याला न्यायालयाने दिलासा दिला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!