🕒 1 min read
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधीक पदके पटकावली. या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकाची कमाई केली. या पदकविजेत्यांचा घेतलेला हा आढावा. यातील चौथा पदकविजेता खेळाडू रवी दहिया.
भारताला आखाड्याचा देश म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटूकडून पदकाची अपेक्षा ही असतेच. मात्र स्पर्धेपुर्वी पदकविजेता भारतीय कुस्तीपटु सुशील कुमार खुनाच्या आरोपाखाली गजाआड गेल्याने कुस्तीत पदक कोण आणणार असा प्रश्न भारतीय चाहत्यांना पडला होता. यात भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कमाई करत याचे उत्तर दिले. रवीने स्पर्धेतील ५७ किलो वजनी गटातुन फ्री स्टाईल कुस्तीत भाग नोदंवला होता. पहिल्या फेरीत त्याने बल्जेरीयाचा कुस्तीपटू जॉर्जी व्हीएन्जेलोव्हला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवला.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रवीचा सामना कोलंबियाचा कुस्तीपटू ऑस्कर टिग्रेरोससोबत होता. या सामन्यात रवीने एकतर्फी खेळ दाखवत ऑस्करला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक मारली. उपांत्यफेरीतील कझाकिस्तानच्या नुरीस्लॅम सनएव्ही विरुद्धच्या अटितटीच्या लढतीत रवीने विजय मिळवत अंतिम फेरी धडक मारली. अंतिम फेरीत रवीचा सामना बलाढ्य रशियाच्या जावुर उगेव्ह याच्या विरुद्ध झाला. संपुर्ण स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य असणाऱ्या रवीला मात्र या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. यामुळे रवीचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले मात्र त्याने रौप्यपदक पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अर्धवट’ सरकारने शेतकऱ्यांचा हातही सोडला; भाजपची टीका
- गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘राज्यातील मंदिरे अद्याप उघडणार नाहीत, थोडी वाट पहावी लागेल’- राजेश टोपे
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
