मुंबई : राज्यासह देशातील दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने अधिक सूट दिली आहे. तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा राज्यावर कायम आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलने वाढली आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा धोका हा कायम असून हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही, त्यामुळे आंदोलने कसली करताय ?, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना खडसावलं आहे.
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं.
‘लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले याची कोणाला जाण नाही, भान नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमूक करा नाही तर आम्ही आंदोलन करू, तमूक करा नाही तर आंदोलन करू, असे इशारे दिले जात आहेत. अरे आंदोलन कसली करताय? कोरोना हा काय सरकार मान्य कार्यक्रम नाही. हा काही मोफत कोरोना वाटपाचा कार्यक्रम नाहीये. आंदोलन करायचे असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट लावण्याचं आंदोलन करा ना,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यातील मंदिरे अद्याप उघडणार नाहीत, थोडी वाट पहावी लागेल’- राजेश टोपे
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘मंत्रालय ते चंद्रपुर मद्यधुंद करण्याचा निर्णय या ठाकरे सरकारने घेतलाय’; भाजपचा हल्लाबोल
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

