Share

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

Published On: 

मुंबई : आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या बद्दल नियमावली जाहीर झाली नाही. तरी गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे सांगतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव निर्बंधातच साजरा करावा लागेल असे संकेत दिले आहेत. तसेच आता मुंबई महानगर पालिकेने देखील. यावर उपयोजना करण्यस सुरुवात केली आहे.

करोनामुळे गणेशोत्सवात गर्दीवर नियंत्रणत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर दिला जाणार असून यावर्षी १५० ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी १३५ कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले होते. गेल्या वर्षीही गणेशोत्सवात करोनाचे सावट होते. यावर्षीही पुढील काही दिवसांत येऊ घातलेल्या मोहरम, गोपाळकाला, गणेशोत्सवासह अनेक सणासुदीच्या काळात शहरात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात शहरातील नागरिकांनी गणेशविसर्जनासाठी बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद दिला होता. पर्यावरणच्या दृष्टीने पालिकेला सहकार्य करून नागरिकांनी गेल्या वर्षी सजगता दाखवली होती.

गणेशोत्सवा वेळी महाराष्ट्रभर जल्लोष आणि आनंदाचे वातावरण असते. येत्या काही दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र, अध्यापही गणेशोत्सवावर निर्बंध असेल कि नाही हा सवाल भाविकांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!