Share

‘राज्यातील मंदिरे अद्याप उघडणार नाहीत, थोडी वाट पहावी लागेल’- राजेश टोपे

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र कालपासून श्रावण महिणा सुरु झाला आहे हा महिना हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच आता सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी सध्या जोर दह्रू लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.

त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘तसेच मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत वाट पहावी लागेल.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान तज्ज्ञांनी शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात आणि मंदिर सुरू करण्याची राज्य सरकारने घाई करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजचा निर्णय संबंधित विभाग घेतली. मंदिरं उघडण्यासाठी आणि कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी थोडी वाट बघू. घाई गडबडीने काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे काही अनर्थ होऊ नये, संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या काळजी पोटी मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक गोष्टी सुचवल्या आहेत. त्यामुळे याबाबत थोडी वाट बघावी लागेल.’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता भाजपच्याअध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दोन दिवसात मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मंदिरे खुली न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!