🕒 1 min read
मुंबई : चर्चेसाठी आम्ही तयार असून, राज्य सरकारने आम्हाला बोलवावे, अशी भूमिका आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या संपावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी वारंवार आवाहन करुनही एसटी कर्मचारी कमावर रुजू न झाल्याने आज एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
दिवाळीपासून गाजलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज महत्वाची घडामोड घडली आहे. आज एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला आता अधिक वेग आला आहे. शुक्रवारपर्यंत एकूण 241 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे ही कारवाई काही काळ थंडावली होती. अनिल परब यांनी आवाहन करुनही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे आज तब्बल 174 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यावर करण्यात येत असलेल्या कारवाई कोणत्याही परिस्थिती मागे घेतली जाणार नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचे दिसत आहे. पूर्वी निलंबन केलेल्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या काळात जे कर्मचारी कामावर रुजू झाले होते, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली गेली आहे. मात्र अद्यापही अनेक जण संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाते आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात लावलेल्या नव्या निर्बंधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
- राज्यपालांचा महाविकास आघाडीला धक्का; आवाजी मतदानाला विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

