Share

राज्यपालांचा महाविकास आघाडीला धक्का; आवाजी मतदानाला विरोध

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय प्रलंबित होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsigh Koshyari) यांची रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर राज्यपाल आपला निर्णय आज देणार असल्याचे सांगितले होते.

राज्यपालांनी आज दिलेल्या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. आता राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे.

राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे. रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियमात बदल करण्यात आला होता. मात्र हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!