Share

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsigh Koshyari) यांनी दिलेल्या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. आता राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावरुन आता विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची (BJP) भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आले आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. ‘जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीने जे काही आम्हाला करता येणे शक्य आहे, ते सगळं काही आम्ही करु. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका आहे’, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असून अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, नाना पटोले यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!