मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट म्हणजेच ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात झपाट्याने वाढत होता. याच प्रार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सांगितले आहे.
येत्या 2 दिवसांत टास्क फोर्सची बैठकही आयोजित करावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्देश त्यांनी दिले आहेत. सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसे देत होतो, सद्या 5 लाख डोसे दिवसाला दिले जात आहेत.
करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
- राज्यपालांचा महाविकास आघाडीला धक्का; आवाजी मतदानाला विरोध
- गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवार-फडणवीसांमध्ये रंगला सामना


