🕒 1 min read
औरंगाबाद : आपण आपल्या मागण्यांवर ठाम राहा. ज्यांनी संप पुकारला होता त्यांनी तो मागे घेतला. संप संपला, मात्र दुखवटा संपू शकत नाही. येणाऱ्या ५ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे मात्र तोपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संयम बाळगत आपल्या मागण्यांवर ठाम राहत आपला हा दुखवटा असाच पुढे चालू ठेवावा. असे आवाहन रविवारी (दि.२६) ॲड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratna Sadavarte) यांनी औरंगाबादेतून मुंबई येथे गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना केले.एसटी
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी ७ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. मात्र २२ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने माघार घेतलेली आहे. आतातरी संप मिटायला हवा होता. मात्र आता तर खरी सुरुवात असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. संघटनेने माघार घेतल्याने संप मिटला आहे. मात्र आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे सुरू असलेला आमचा हा दुखवटा जोपर्यंत एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत असाच सुरू राहणार असल्याचे औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
रविवारी औरंगाबाद येथील २५ एसटी कर्मचारी या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी वकीलपत्र सोपवलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेले होते. यावेळी संपातून माघार घेऊ नये, ५ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत निकाल आपल्याच बाजूने लागणार असून तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपला हा लढा असाच सुरू ठेवावा असे आवाहन सदावर्ते यांनी समस्त कर्मचाऱ्यांना केले. आज औरंगाबाद विभागातून ८१ बसेसच्या २७० फेऱ्यांमधून ४४२७ प्रवाशांनी प्रवास केला.
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
- जो रूटने रचला इतिहास; केला ‘हा’ खास विक्रम
- दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी- केशव उपाध्ये
- “इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे”, राऊतांनी काढला राज्यपालांना चिमटा
- ‘भारताला 350 धावांत गुंडाळले तर सामना जिंकू’; द. आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजाची प्रतिक्रिया


