Share

कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल

Published On: 

🕒 1 min read

रायपूर : आपल्या व्हिडीओवरून नेहमीच चर्चेत असणारे अकोल्याचे कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरुन ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात केली जात होती.

कालीचरण महाराज यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. कालिचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण रायपूरचे आहे, जिथे धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेसने आपला निषेध नोंदवला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मोहन मरकाम यांनी रात्री उशिरा 12 वाजता सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यासोबतच कालीचरण महाराजांविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी काँग्रेस नेतेही रात्री उशिरा टिकरा पारा पोलीस ठाण्यात पोहोचले.

दरम्यान, कालीचरण महाराजांचा महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व स्तराहून संताप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केवळ काँग्रेससह अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!