मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाश्वर्भूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेआधी २०१९ मध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडावरही चर्चा सुरु असताना आता खुद अजित पवार यांनी यावर संवाद साधला आहे.
“तीन पक्षांच्या सरकारपेक्षा दोन पक्षांचं सरकार चांगलं”, असं तुम्ही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर म्हणाला होता, असे पत्रकाराने विचारल्या नंतर अजित पवारांनी स्वत:कडे हात करत, कोण मी? असा प्रश्न पत्रकाराला विचारला. त्यावर पत्रकाराने ‘होय, नोव्हेंबर २०१९ मध्ये’ असं उत्तर दिलं. पत्रकारने थेट देवेंद्र फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ दिल्यानंतर अजित पवारांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, “मी जेव्हा पहिल्यांदा शपथ घेतली होती ना, त्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर आलोच नव्हतो,” असं अजित पवार यांनी एकदम हातवारे करुन सांगितलं. ते पाहून अजित पवारांच्या बाजूला बसलेले राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासहीत सर्वच पत्रकार जोरजोरात हसू लागले.
नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा-
“सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत. ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) बंडखोर आमदारांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असा इशारा नारायण राणे यांनी शरद पवारांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –


