मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सेनेला जशी गळती लागली आहे. अशातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आसाममध्ये या, असे आमंत्रण दिले असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आसाममध्ये या असे आमंत्रण दिलेले आहे. राजकीय घडामोडीसाठी नाही तर आता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी या, असे म्हणत सध्याच्या एक प्रकारे राजकीय परस्थितीवर खिल्ली उडवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदारांचा गट तयार झाला असल्याची चर्चा आहे. तर आता सेनेकडे फक्त १५ आमदारांचा पाठींबा आणि साथ आहे. शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आसाममध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –


