मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र राजकीय संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची गटबाजी मजबूत होत आहे. तर उद्धव ठाकरेंपासून एक एक करून आमदार वेगळे होताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. असं असतानाच शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बसलाय. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आलीय.
या कारवाईमुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. जालना जिल्यातील जालना सहकारी साखर कारखान्यावर ही कारवाई करण्यात आलीय. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल 78 कोटी 38 लाखाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. खोतकर यांची मालमत्ता असलेली जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट आणि एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर जप्त करण्यात आलंय. याबाबतची माहिती ईडीने आपल्या ऑफिशिलय ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.
दरम्यान, याआधी २१ तारखेला परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर यांची ईडी चौकशी सुरु होती. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा गंभीर आरोप केले होते. यानंतर त्यांना ईडीने समन्स बजावले होते. २१ तारखेच्या सकाळपासून ईडी कार्यालयात परब यांची चौकशी सुरू झाली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :


