मुंबई : ओडिया चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रायमोहन परिदा (Raimohan Parida) यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. यांच्या अचानक निधनाने संपूर्ण ओडिया चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वय ५८ वर्ष होते. माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय आहे. पण त्यांच्या मृत्यूबाबत अजून कोणतही कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
माहितीनुसार, रायमोहन परिदा यांचा मृतदेह त्यांच्या भुवनेश्वर येथील राहत्या घरी आढळला. मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत्यू कसा झाला याचे कारण आद्यपही समोर आलेलं नाही. मृत्यूच कारण शोधण्यासाठी रायमोहन यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आता याप्रकरणी पोलिसांचा देखील तपास चालू आहे.
रायमोहन परिदा यांचे ओडिया चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठं नाव आहे. त्यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओडिया व्यतिरिक्त बंगाली चित्रपटांमध्ये देखील यांनी काम केले आहे. त्यांनी १३ बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. रायमोहन परिदा यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :


