Share

Uddhav Thackeray : “हिम्मत असेल तर ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न घेता…” ; उद्धव ठाकरे गरजले

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) जिल्हा आणि तालुका प्रमुखांच्या बैठकीत शिवसेनेतील बंडखोरीबद्दल संताप आणि दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर ताशेरे ओढले आणि त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे नाव न घेता त्यांच्या उभे राहण्याचा इशारा दिला.

“हिमंत असेल तर शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न घेता उभे राहून दाखवा. माझा फोटो न दाखवता लोकांमध्ये जा. मरणार पण शिवसेना सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी आज शिवसेना सोडली. शिवसेना फोडण्याचे पाप बंडखोरांनी केले आहे. ज्यांना मला मुख्यमंत्री म्हणून बघायचे नाही, त्यांच्या महत्त्वाकांक्षा राक्षसी आहेत. जे आम्हाला सोडून गेले त्यांची मी काय काळजी करू?”,असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

शिवसेनेतील बंडखोरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जबाबदार धरले. एकनाथ शिंदे यांनी भाजपची ठिणगी आगीच्या रूपाने पेटवली. मला सत्तेची हाव नाही, असे उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख यांच्या बैठकीत सांगितले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं. काहींनी मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मला सत्तेचा लोभ नाही. मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मात्र मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!