Share

Sudhakar Awhad : मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या समोर दोनच पर्याय आहेत – अ‍ॅड. सुधाकर आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाश्वर्भूमीवर अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंसमोर फक्त दोनच पर्याय असल्याचे खळबळजनक विधान केले आहे.

पहिला पर्याय म्हणजे, विधानसभा बरखास्त करा असा सल्ला राज्यपालांना देणे आणि राज्यपाल ती विधानसभा विसर्जित करू शकतात. पुन्हा हा निर्णय नायालयीन प्रक्रियेसाठी राहू शकतो. आणि दुसरा म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही किंवा विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला नाही तर सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल, असे अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले, “सध्याची परिस्थिती पाहता सध्या सेनेकडे किती आमदार आहेत हे पाहण देखील महत्वाचं आहे. यामध्ये राज्यघटनेत देखील केलेली दुरूस्ती पहावी लागेल. त्यात जे निकष आहेत त्यानुसार कोणता गट अपात्र होऊ शकेल हे पाहण देखील महत्वाचं आहे. यात गटनेता महत्वाची भूमिका बजावणार आहे. पक्ष प्रमुखच नेहमी गटनेते ठरवतात आणि पुढे गटनेता प्रतोद नेमतात. विधानसभेच्या बाहेर आणि विधानसभेचे आत असं दोन प्रकारे राजकीय पक्षाचं अस्तित्व असतं”.

विधानसभेतील कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रमुख हा सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे. जर बारा लोक आधी अपात्र केले तर सध्याच्या सरकारला बहुमत सिद्ध करणे सोपे जाईल. पण जर शिंदे यांचा गट स्थापन झाला तर मग सरकार टिकणे अवघड आहे. यात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा महत्त्वाचा ठरू शकतो. आधीच्या कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय कुठल्याही कोर्टात चॅलेंज करता येऊ शकत नव्हते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंधन आणत आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज करू शकता, असं सांगण्यात आंल आहे. या पद्धतीने गेले तरी शेवटी कोर्टातच जावं लागणार आहे. ही लढाई अंतिम रित्या कोर्टातच लढली जाईल मात्र या लढाईचा प्रवास कसा असेल हे मुख्यमंत्री आणि विधानसभेचे हंगामी अध्यक्ष यांच्यावर अवलंबून असणार आहे. असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!