Share

VIDEO : कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा पराक्रम! सुनील गावसकर म्हणतात, “मला तर त्यावेळी माउंट एव्हरेस्ट…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जो रूटने रविवारी, ५ मे २०२२ रोजी लॉर्ड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ११५ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. यादरम्यान त्याने १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील १४वा आणि इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. तथापि, जो रूटला सचिन तेंडुलकरचा १५,९२१ कसोटी धावांचा सार्वकालीन विक्रम मोडायचा असेल तर त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कसोटी क्रिकेटमधील पहिल्यांदा दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज भारताचे सुनील गावसकर (Sunil Gavaskar) होते.

गावसकर यांनी १२५ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ३४ शतकांसह १०,१२२ कसोटी धावा केल्या. गावसकर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला ‘जादुई’ क्षणाबद्दल सांगितले होते. गावसकर यांनी १०,००० कसोटी धावांचा आकडा गाठणे म्हणजे पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्ट चढणे असे म्हटले होते.

गावसकर म्हणाले होते, ”एकदा तुम्ही १०००० पर्यंत पोहोचलात की ते पूर्णपणे जादुई असते. ९००० धावासुद्धा याआधी झाल्या नव्हत्या आणि मी ते केले. पण ही चार अंकी संख्या आहे. १०००० ही पाच-अंकी संख्या आहे, त्यामुळे ही कामगिरी पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्टवर चढल्यासारखी वाटत होती.”

सुनील गावस्कर यांनी १९८७ मध्ये १०,००० कसोटी धावा करण्याचा पराक्रम केला होता. ‘लिटिल मास्टर’ने पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात ६३ धावा केल्या होत्या. त्यांनी ५८ धावा करताच १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. त्यानंतर प्रेक्षक त्याचे अभिनंदन करण्यासाठी मैदानात दाखल झाल्याने खेळ काही काळ थांबवण्यात आला. त्या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!