मुंबई : अभिनेत्री काजोल ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. काजोल तिच्या आईसोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. काजोलने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
काजोलने वयाच्या १६ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘पहिल्यावहिल्या’ या चित्रपटाने काजोलला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली होती. नंतर ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे पूर्ण आयुष्य बदलले. नुकतीच काजोलने ‘कोण होणार करोडपती’ मंचावर हजेरी लावली त्यावेळी तिला हिंदी सिनेसृष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यावर ती म्हणाली, “मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते”. असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
https://www.instagram.com/p/CeeFVcFq-VV/
पुढे ती म्हणाली, “मी हाच विचार करायचे की मी नोकरी करणार ज्या ठिकाणाहून मला चांगला पगार मिळेल. मला अशा प्रकारची नोकरी करायची होती”. यावर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर म्हणाले, “बरं झालं तुम्ही तो विचार केला नाहीत. अन्यथा आम्ही तुमच्या चांगल्या चांगल्या चित्रपटांना हुकलो असतो.” त्यावर तिची आई देखील म्हणाली हिने नोकरी केली असती तर ऑफिसमधल्या लोकांच काय झाले असते. यावर सर्वजन हसायला लागले.
महत्वाच्या बातम्या :


