Share

IND vs SA : चहलच्या रडारवर भारताचा अश्विन..! पहिल्याच टी-२० सामन्यात ‘महाविक्रम’ करण्याची सुवर्णसंधी; नक्की वाचा!

Published On: 

मुंबई : टीम इंडियाचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहल भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील मालिकेत आपले गोलंदाजी कौशल्य दाखवणार आहे. या मालिकेत चहलही मोठा विक्रम करू शकतो. उद्या ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत चहल रवीचंद्रन अश्विनचा विक्रम मोडू शकतो. सध्या अश्विन टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आता चहल हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

आर. अश्विनच्या नावावर आतापर्यंत २८२ टी-२० सामन्यात २७६ विकेट्स आहेत. चहलने २४२ टी-२० सामने खेळले असून २७४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. म्हणजेच अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून तो अवघ्या २ विकेट्स दूर आहे आणि तीन विकेट घेताच तो अश्विनला मागे सोडेल.

या आयपीएलमध्ये चहलने शानदार गोलंदाजी करत स्पर्धेत एकूण २७ बळी घेत पर्पल कॅप मिळवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत युझवेंद्र चहल प्रोटीज संघासाठी अतिशय धोकादायक गोलंदाज ठरू शकतो. आयपीएलच्या या मोसमात चहलनेही दिल्लीविरुद्ध हॅट्ट्रिक घेत सामना फिरवला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!