अमरावती: आज देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण सुरू आहे. हिंदू-मुस्लिम दंगा करता येईल का, दलित-अदलित करता येईल का, याचा प्रयत्न केला जात आहे. जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये, भाषांमध्ये वाद निर्माण करतोय, अशा प्रवृत्तीविरोधात संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार आहे. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते काल (१० एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.
आज महाराष्ट्रात आपण तीन पक्षाचे सरकार निर्माण केले. समस्या आहेत, पण आपण तीनही पक्ष एकत्र बसून मार्ग काढत आहोत. केंद्राचे सहकार्य नसले तरी आपण सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. आज देशाच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न महागाईचा आहे. इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. देशातील शिक्षित पिढीला रोजगार मिळत नाही. रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता राबवायची असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. राज्यांना मदत करायची नाही, त्यांच्या अडचणी वाढवायच्या या प्रकारची भूमिका घेऊन जर केंद्र सरकार चालत असेल तर तुमची माझी जबाबदारी अधिक वाढते. असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
त्यामुळे जे एका विचाराचे आहेत, त्यांना सोबत घेऊन सामान्य माणसाचे दुखणे दूर केले पाहिजे. सांप्रदायिक विचार घेऊन माणसांमध्ये अंतर वाढविण्याचे काम कुणी करत असेल तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पार पाडेल, असा विश्वास मला वाटतो. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता…”, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा
“महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही”, संजय राऊतांचा हल्लाबोल
IPL 2022 RR vs LSG : भांबावून टाकणारा सामना..! चुरशीच्या लढतीत राजस्थानची लखनऊवर ३ धावांनी सरशी
RR vs LSG : बोल्टनं दिला ४४० वोल्टचा धक्का..! शून्यावरच केएल राहुलचा उडवला त्रिफळा; पाहा VIDEO
IPL 2022 RR vs LSG : हेटमायरचा हिट शो..! राजस्थान रॉयल्सचं लखनऊला १६६ धावांचं आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

