मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘महाराष्ट्रात तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही. दिल्लीत शरद पवारांवर एका माथेफिरूने हल्ला करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. अण्णा हजारे वगळता सगळ्या महाराष्ट्राने तेव्हा हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याचे समर्थन करणारे अण्णा हजारे आज विस्मृतीत गेले. भाजपच्या गुणरत्नांचे समर्थन करणाऱ्यांनी हे विसरू नये. माकडांची माणसं झाली यास उक्रांती म्हणतात, पण काही माकडं ही माकडेच राहिली. त्या माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेला हल्ला धक्कादायक आहे. स्वतःस एस.टी. कर्मचारी म्हणवून घेणारा एक गट पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाकडे पोहोचला. त्या हिंसक आणि मद्यधुंद झुंडीने पवारांच्या घरावर हल्ला केला. महाराष्ट्राच्या राजकीय सलोख्यास, संस्कृतीस काळिमा फासणारे हे कृत्य आहे. मुंबईतील कामगार चळवळीस एक परंपरा आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबईतील कामगार वर्गाचे योगदान मोठे आहे. कामगार चळवळही यामुळे बदनाम झाली आहे’, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- RR vs LSG : बोल्टनं दिला ४४० वोल्टचा धक्का..! शून्यावरच केएल राहुलचा उडवला त्रिफळा; पाहा VIDEO
- IPL 2022 RR vs LSG : हेटमायरचा हिट शो..! राजस्थान रॉयल्सचं लखनऊला १६६ धावांचं आव्हान
- VIDEO : आयपीएलमध्ये येताच वॉर्नरनं उडवला धुरळा..! चक्क मैदानातच केला ‘श्रीवल्ली’ गाण्यावर ‘नादखुळा’ डान्स; पाहा…
- “उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करायला सांगत आहेत” – चंद्रकांत पाटील
- “कोल्हापूरमधून भगवा पुसू देणार नाही” – उद्धव ठाकरे


