Share

“चित्रपटात काही धर्मनिरपेक्ष लोक…” द कश्मीर फाइल्सवर नितीन गडकरींचे विधान चर्चेत

Published On: 

मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या सत्यतेवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, देशातील सर्व जनता या चित्रपटाबाबत आपली मते मांडत आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते देशातील जाणत्या लोकांचा समावेश असून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही त्यात सामील झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, ‘द काश्मीर फाइल्स’ने खरा इतिहास सर्वांसमोर मांडला आहे. हा चित्रपट देशाच्या दीर्घकाळ स्मरणात राहील

दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये चित्रपटातील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी, अनुपम खेर यांच्यासह दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी उपस्थित होते.  या कार्यक्रमात गडकरी यांच्या उपस्थितीत ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ तर्फे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या कलाकार आणि दिग्दर्शकाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते श्याम जाजूही उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, “काश्मिरी पंडितांचा छळ करण्यात आला आणि त्यांना काश्मीरमधून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले हे खरे आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांची दुर्दशा आणि त्यांची दयनीय अवस्था सर्वांसमोर अचूकपणे मांडली आहे. मी पुन्हा भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. काश्मिरी पंडितांचा खरा इतिहास लोकांना माहीत नव्हता आणि हे सत्य लपविण्याचे अनेक प्रयत्न झाले.

गडकरी पुढे म्हणाले की, विवेक अग्निहोत्री यांनी ज्या पद्धतीने चित्रपट दिग्दर्शित केला आहे, त्याद्वारे त्यांनी काश्मीरची सत्यकथा लोकांसमोर मांडली आहे. हा चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहील. ‘द काश्मीर फाइल्स’ नवीन पिढीला काश्मिरी पंडितांच्या इतिहासाची ओळख करून देईल.  त्याबद्दल मी विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानतो.  काही सेक्युलर लोक चित्रपटात रस घेत नाहीत.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : RCB विरुद्ध युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग; पत्नी धनश्रीचं ‘क्रेझी सेलिब्रेशन’ व्हायरल!
शरद पवारांनी घेतली मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधान
“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान’; मोदींचा पुनरुच्चार
IPL 2022 KKR vs MI : आज दोन मुंबईकरांमध्ये लढत..! वरचष्मा मात्र रोहितसेनेचाच; वाचा कारण!
IPL 2022: शिष्य पडिक्कलला बाद केल्यानंतर गुरु कोहलीने केले ‘असे’ सेलिब्रेट; रिऍक्शनचा VIDEO व्हायरल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!