Share

“फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी…”, अहमदनगरच्या नामांतर वादवरून अमोल मिटकरींची टीका 

Published On: 

मुंबई: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या या पत्रात पडळकर यांनी विविध मुद्दे मांडले असून अहमदनगर या जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ असे ठेवा, अशी मागणी केली आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचे सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतली आहे. त्यातील एका सुपारी बहाद्दराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे सुद्धा सोयीने राजकारण केले. या पत्रामागे फडणवीस असून त्यांनीच हे पत्र लिहिण्यासाठी भाग पाडले असल्याचा दावाही मिटकरी यांनी केला आहे. अर्ध हळकुंडाने पिवळ झालेल्या या नेत्याच्या पत्राला कवडीची किंमत नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही मिटकरी यांनी पडळकर यांना लगावला आहे.

दरम्यान हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, अशा आशयाचे पत्र पडळकर यांनी लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!