Share

“मुख्यमंत्री ठाकरे शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलचे…”, गोपीचंद पडळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या या पत्रात पडळकर यांनी विविध मुद्दे मांडले असून अहमदनगर या जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ असे ठेवा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली आहे.

“अहिल्या भक्तांच्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे, असे पत्र मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करून  ते सिद्ध करतील की, ते शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे मुख्यमंत्री नाहीत.”, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, अशा आशयाचे पत्र पडळकर यांनी लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!